तिरुवअनंतपूरम : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून देशभरात साधारण यदोन महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र शासनाकडून राज्यशासनाला काही मुभा देण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यांतील लॉकडाऊनचं स्वरुप नेमकं कसं असावं याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र देण्यात आल्यामुळं अनेक राज्यांनी परिस्थितीजन्य निर्णय घेतले. यातच केरळ राज्य शासनाच्या निर्णयानं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. लॉ़कडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवळी केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांनी काही महत्त्वाच्या घोषणा करत पुढील काळासाठी राज्यातील एकंदर परिस्थिती कशी असेल याचा आराखडा सादर केला.



मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार लॉकडाऊन 4 असतानाही केरळमध्ये एक दिवसाआड अशा तत्त्वावर ५० टक्के दुकानं, शॉपिंग कॉ़म्प्लेक्स सुरु राहतील. त्याशिवाय केशकर्तनालयं, पार्लरही सुरु राहतील. पण, या ठिकाणी AC अर्थात वातानुकूलित यंत्रांचा वापर करणं टाळावं लागणार आहे. फक्त केस कापणं आणि दाढी करणं अशाच सुविधा केशकर्तनालयांमध्ये देण्यात येतील.