तयारीला लागा! केंद्र सरकारडून तब्बल 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार
Government jobs | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोक-यांबाबत बंपर घोषणा केलीय. पंतप्रधान मोदींनी देशात दीड वर्षात 10 लाख सरकारी नोक-या देण्याचा निर्णय घेतलाय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोक-यांबाबत बंपर घोषणा केलीय. पंतप्रधान मोदींनी देशात दीड वर्षात 10 लाख सरकारी नोक-या देण्याचा निर्णय घेतलाय.
पंतप्रधान कार्यालयाकडून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि पुढील 1.5 वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती सरकारकडून करण्यात यावी असे निर्देश दिले.
भारतात कोरोना काळात बेरोजगारीचा दर वाढला होता. कोरोना नंतर अर्थव्यवस्थेला गती येत असल्याचे दिसून येत आहे. तर नोकऱ्यांमध्येही वाढ होतेय. त्या पार्श्वभूमीवर सरकारी पदांसाठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकाने मोठी घोषणा केली आहे. पुढील 1.5 वर्षात 10 लाख उमेदवारांची सरकारी भरती होणार आहे.