तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, अण्णा द्रमुकचे १५ आमदार भाजपात दाखल
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक नेते आणि १५ आमदार शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत.
चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक नेते आणि १५ आमदार शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत.
नवी दिल्ली येथे पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत हे नेते भाजपमध्ये दाखल झालेत. हा अण्णा द्रमुखला मोठा धक्का आहे.
भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांमध्ये माजी उद्योग मंत्री नयनर नागेंद्रन, आर्कोटचे माजी आमदार आणि एआयडीएमके केडर श्रीनिवासन आणि माजी वेल्लोरचे महापौर पी. कार्त्यायिनी यांचा समावेश आहे.
नागेंद्रन तामिळनाडूतील राजकीयदृष्ट्या शक्तिशाली तेवर समाजातील आहेत. १५ आमदारांच्या प्रवेशामुळे के. पलानीस्वामी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अण्णा द्रमुकच्या दोन लढाऊ गटांत पनिरसेल्वम आणि पालनीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील विलीनीकरणानंतर अण्णा द्रमुकच्या आमदारांनी १९ अण्णा द्रमुकच्या आमदारांनी तामिळनाडूतील सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. १९ बंडखोर आमदारांनी तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना निवेदन सादर केले.
ऑगस्टच्या अखेरीस पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राज्याच्या भेटीनंतर द्रमुक आणि अण्णा द्रमुक नेते व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.