पाटणा : बिहारमधील पाटण्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर इन्कमटॅक्सचे छापा मारला आहे. साडे आठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कारमधून साडेआठ लाख रुपये मिळाल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोयल यांचीही चौकशीही करण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला रंगत आली असताना इन्कमटॅक्स धाड पडल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.  काँग्रेस मुख्यालयावर  इन्कमटॅक्स विभागाने धाड टाकली आहे. इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. हे पैसे कुणाचे आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 


शक्तीसिंह गोयल यांनी याप्रकरणी इन्कमटॅक्स विभागावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की पैसे काँग्रेस मुख्यालयात नाही तर मुख्यालयाच्या परिसरात पार्क केलेल्या एका कारमध्ये सापडले आहेत. तरीही काँग्रेसला नोटीस बाजवण्यात आली आहे,  असे असले तरीही आम्ही तपासात सहकार्य करु, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


भाजपच्या उमेदवाराकडे २२ किलो सोने


 दरम्यान, रक्सोलमध्ये भाजपच्या उमेदवाराकडे २२ किलो सोने आणि अडीच किलो चांदी सापडली आहे. इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांनी तिथे कारवाई का केली नाही, असाही प्रश्न शक्तीसिंह गोयल यांनी विचारला आहे.