पाटणा : बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या  ( Bihar assembly election 2020) आणि अंतिम फेरीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५४.०६ टक्के मतदान झाले. १५ जिल्ह्यातल्या ७८ विधानसभा मतदार संघात मतदान पार पडले. यात २ कोटी ३५ लाखाहून अधिक मतदारांनी १ हजार २०४ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले आहे. यात ११४ महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात नितीश सरकारच्या १२ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज कटिहार, पूर्णिया, सुपौल, दरभंगा, वैशाली, मुझफ्फरपूर, सीतामढी आणि किशनगंजमध्ये मतदान पार पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार विधानसभा (Bihar assembly) निवडणूक २०२० च्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ७८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ७८ मतदारसंघांतून तब्बल १२०४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.



बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ५५.७० टक्के मतदान झाले होते. आज तिसऱ्या टप्प्यात दुपारी ३.०० वाजेपर्यंत बिहारमध्ये जवळपास ४४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.