Bihar Crime : बिहारमधून (Bihar News) गुन्हेगारीच्या रोज काही ना काही विचित्र घटना समोर येत असतात. पण अशाही काही घटना असतात ज्यामुळे अनेकांना धक्का बसू शकतो. अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत ज्यामध्ये दोन महिला या एका पुरुषासाठी मारामारी करताना दिसत आहे. थांबा त्या महिला काही अशाच भांडत नाहीये तर त्यांना त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ती व्यक्ती त्या महिलांचा दीर आहे आणि त्या दोघी एकमेकांच्या वहिणी आहेत. आश्चर्य वाटेल पण असं खरच घडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या नालंदा येथून हा मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दीरासोबत लग्न करण्यावरून दोन वहिणींमध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही महिलांना त्यांच्या धाकट्या दीराशी लग्न करायचे होते. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढं वाढली की दोघांमध्ये मारामारी सुरु झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं.


नालंदाच्या एका गावात हा सगळा प्रकार घडला आहे. गावात राहणाऱ्या हिरेंद्र पासवानच्या मोठ्या भावांच्या पत्नींना त्याच्याशी लग्न करायचे होते. हिरेंद्रच्या एका भावाचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या विधवेचे लग्न हिरेंद्रशी व्हावे, अशी आई-वडील आणि गावकऱ्यांची इच्छा होती. तर दुसऱ्या भावाच्या पत्नीला मालमत्तेच्या लालसेपोटी आपल्या दीराशी लग्न करायचे होते. मात्र दोघांमध्ये वाद वाढला आणि हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.


सुरुवातीला दोन्ही महिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर वाद वाढता वाढता हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. दोघांनी एकमेकांनी जोरदार लाथा-बुक्क्या मारहाण केली. या मारामारीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. दोघांच्या हाणामारीत इतर कुटुंबीय सहभागी झाले होते. हाणामारी वाढण्यानंतर गावातल्या लोकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद काही मिटत नव्हता. शेवटी गावकऱ्यांनी भांडणात उतरुन दोन्ही बाजू शांत केल्या आणि हे प्रकरण शांत झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.



दरम्यान, पोलीस आल्यानंतर दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी यावर तोडगा काढला. पोलिसांनी सांगितले की, ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने हिरेंद्रचा विवाह त्याच्या विधवा वहिनीसोबत लावण्यात आला. कारण हिरेंद्र पासवानचे अजूनही शिक्षणामुळे लग्न झाले नव्हते. मोठ्या आणि मधल्या भावाला प्रत्येकी तीन मुले आहेत.