Bihar Crime : अभिनेता आमिर खान याचा 3 इडियट्स हा चित्रपटा चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) एका महिलेची प्रसृती करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar News) घडलाय. मात्र यामध्ये गर्भवती महिलेचा (Pregnant woman) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञासोबत व्हिडिओ कॉलवर शस्त्रक्रिया केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या पूर्णियामध्ये एक डॉक्टर गर्भवती महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे नर्सद्वारे शस्त्रक्रिया करून घेत होती. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेसाठी महिला डॉक्टर पाटण्याहून परिचारिकांना व्हिडिओ कॉलवरुन सूचना देत होती. त्यावेळी झालेल्या एका चुकीमुळे महिचेचा जीव गेला.


मालती देवी नावाच्या गर्भवती महिलेला सोमवारी पूर्णियातील लाईन बाजार भागातील समर्पण प्रसूती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी या रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ सीमा कुमारी शहराबाहेर होत्या. असे असतानाही रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया केली. मालतीला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याचं कळवल्यावर परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सीमा कुमारींचा व्हिडीओ कॉलवर सल्ला घेतला आणि प्रसूती केली. यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय देखील घेतला.


डॉक्टर सीमा कुमारी यांनी परिचारिकेला व्हिडिओ कॉलद्वारे सूचना दिली आली आणि ऑपरेशन सुरु झाले. मात्र अनवधानाने मालती देवीच्या पोटातील एक महत्त्वाची नस कापली. यानंतर मालतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालतीने यावेळी जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन्ही मुलांचा प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.


मृत मालती देवीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "प्रसूती वेदना होत असल्याने बहिणीला समर्पण प्रसूती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तिला गर्भवती महिलेला प्रसूती कक्षात नेण्यात आले.ऑपरेशन दरम्यान रक्तवाहिनी कापण्यात आली. त्यानंतर घरातील काही सदस्य आत गेले असता महिला पडून होती. मात्र, दोन्ही नवजात बालके सुखरूप होती. पटना येथे बसलेल्या रुग्णालयाच्या संचालक डॉ. सीमा कुमारी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शस्त्रक्रियेसाठी  परिचारिका आणि कंपाउंडरला बोलावले होते."


दरम्यान अतिदक्षता विभागामध्ये दाखल असलेल्या नवजात बालकाची काळजी घेणारे कर्मचारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती  पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृताच्या नातेवाईकांशी बोलून त्यांनी तपास सुरु केला आहे.