पाटणा: भाजपमधील नेत्यांची आक्षेपार्ह विधाने आणि वाचाळवीरपणा जनतेला आता काही नवीन राहिलेला नाही. या वाचाळवीरांच्या यादीत आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची भर पडली आहे. किमान पितृ पंधरवड्याच्या काळात तरी अपराध करू नका, असे आवाहन त्यांनी गुन्हेगारांना केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका जाहीर सभेत मोदी यांनी हे वक्तव्य केले. पितृ पंधरवड्याच्या काळात बिहारमध्ये धार्मिक विधींसाठी परराज्यांतून लोक येतात. या लोकांना कोणतीही तक्रार करण्याची संधी मिळाली नाही पाहिजे. त्यासाठी गुन्हेगारांना मी हात जोडून आवाहन करतो की, किमान पितृपक्षात तरी अपराध करू नका. इतर दिवशी तुम्हाला समजावूनही तुम्ही अपराध करत असता. पोलीसही आपले काम करत असतात. मात्र, किमान पितृपक्षाच्या दिवसांमध्ये धार्मिक उत्सवात बाधा आणू नये. जेणेकरून बिहारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, असे मोदींनी म्हटले. 


इतके करुनही गुन्हेगारांनी ऐकलेच नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची फौज समर्थ आहे. त्यामुळे कोणीही पळून जाऊ शकणार नाही, अशी तंबीही सुशील मोदी यांनी दिली.