पटना : बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणूक २४३ जागांकरता तीन टप्प्यात पार पडली. आज या निवडणुकीची मतमोजणी (Bihar Election Results Counting) होणार आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत (Bihar Election Results 2020) शिवसेना (Shivsena) अतिशय उत्साही आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या विजयाची भविष्यवाणी करताना त्यांची तुलना जो बायडन (Joe Biden) यांच्याशी केली आहे. यावेळी शिवसेनेने पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. 


'तेजस्वी - बायडन! अटळ सत्तांतर'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या 'सामना'तून 'तेजस्वी - बायडन! अटळ सत्तांतर' या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला. भारतात देखील अमेरिकेप्रमाणे संत्तार होण्याची लक्षण स्पष्ट दिसत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. अमेरिकेत ज्याप्रमाणे चित्र पालटलं त्याचप्रमाणे या निकालानंतर बिहारचं चित्र पालटणार आहे. 


पंतप्रधान मोदी आणि नीतीश कुमार सारखे नेते युवा तेजस्वी यादव यांच्यासमोर टिकू शकणार नाही. खोट्याचा फुगा हा हवेत सोडला जातो आणि तो हवेतच गायब होतो, असं काहीसं होणार आहे. 


पंतप्रधान मोदी आणि नीतीश कुमार यांच्यावर साधला निशाणा 


अग्रलेखात लिहिलं आहे की,'बिहार निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि नीतीश कुमार यांच्यासमोर जनतेने गुडघे टेकलेले नाहीत. यादव यांच्या सभेत लोकांचा जनसुमदाय लोटला होता. मात्र पंतप्रधान मोदी आणि नीतीश कुमार निर्जीव मटक्यांच्या समोर भाषण देत होते.' तसेच बिहारमध्ये जंगलराज येणार अशी परिस्थिती दाखवण्यात आली. मात्र लोकांनी स्पष्ट केलं की तुम्ही जा... जंगलराज आलाच तर आम्ही बघू 


जो बायडन आणि तेजस्वी यांचा संघर्ष 


शिवसेनेने अमेरिकेसोबतच बिहारच्या जनतेचं अभिनंदन केलंय. संपादकीयमध्ये पुढे म्हटलं की, अमेरिका आणि बिहारची जनतेचं जेवढं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे. जनता हेच सर्वात शक्तीमान आहे.