पटना : भाजपकडे स्टार प्रचारकांची सर्वात मजबूत सेना आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये आघाडीवर आहे. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधानांची प्रचंड मागणी असते. मोदींच्या नंतर यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ देखील एक मोठे प्रचारक मानले जातात. आता बिहारमधील निवडणुकीत दोन्ही नेते एनडीएसाठी जाहीरपणे प्रचार करतांना दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएम योगी मोदींच्या आधी बिहारच्या कैमूर येथून आपल्या प्रचाराची सुरूवात करत आहेत. योगींची पहिली सभा 20 ऑक्टोबरला आहे. 23 ऑक्टोबरपासून मोदींची मोहीम सासाराममध्ये सुरू होईल. पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी तीन जिल्ह्यात बैठक घेतील. सीएम नितीश कुमार हे त्यांच्यासोबत उपस्थित असतील. बिहारमध्ये मोदी एकूण 12 सभा घेतील. तर 28 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये तीन रॅली करतील.


योगींना हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून पाहिले जाते. अशी अपेक्षा आहे की योगी भाजपच्या कोट्यातील जागांवर एकल बैठका घेतील. एनडीएच्या मित्रपक्षांनी देखील आपल्या भागात योगींच्या बैठक घेण्याची मागणी केली आहे. पहिल्या दिवशी योगी उत्तर प्रदेशला लागून असलेल्या भागात तीन सभा घेतील.


निवडणुकीत योगी खुलेआम हिंदुत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दिल्ली आणि हरियाणा निवडणुकीतही भाजपने बऱ्याच सभा घेतल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बिहारमध्ये 18 जाहीर सभा घेणार आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या बिहारमधील दुसर्‍या निवडणुकीच्या दौर्‍याचा आज शेवटचा दिवस आहे. दोन दिवसात नड्डांच्या चार सभा आहेत. भाजपचे मोठे नेते राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करीत आहेत.