कॉलेजचं प्रेम आणि नंतर लग्न; 3 दिवसांपूर्वींच विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाचा रिसेप्शनच्या दिवशीच मृत्यू
क्षणार्धात या नवविवाहित जोडप्यावर दुखःचा डोंगर कोसळलाय. लग्न घरासह संपूर्ण गावात शोककळा पसरलीय.
Accident News : बिहारमध्ये (Bihar) एका नवविवाहित जोडप्यावर दुखःचा डोंगर कोसळलाय. दोन बाईकच्या झालेल्या गंभीर अपघातात (Accident) नुकतंच लग्न झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. यासोबत दुसऱ्या बाईकवरच्या तरुणाचाही या अपघातात मृत्यू झालाय. 27 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात (love marriage) अडकलेले तरुण पूजेचे सामान घेण्यासाठी बाईकवर गेला होता. मात्र घरी परतण्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातलाय. तीन दिवसांतच एका अपघाताने या जोडप्याला वेगळं केले.
बिहारमधील सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री दोन बाईकचा अपघात झाला. दोन बाईकची समोरासमोर धडक झाली. अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे 27 नोव्हेंबरलाच लग्न झाले होते. पूजेसाठी तो वस्तू खरेदी करण्यासाठी बाईकवरुन गेला होता. त्यावेळी हा गंभीर अपघात झाला. यात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांवर पाटण्याच्या पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लग्नघरात एकच खळबळ उडाली आहे.
सारण जिल्ह्यातील तरैया प्रखंडमधील पोखरेरा गावात मंगळवारी रात्री दोन वेगात असलेल्या बाईकचा अपघात झाला. या अपघात चौघेजण जखमी झाले होते. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता दोन्ही बाईकचा चुराडा झाला. चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र नवविवाहित रोशनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
या अपघातात जीव गमावणाऱ्या 28 वर्षीय रोशनचा 27 नोव्हेंबर रोजीच प्रेमविवाह झाला होता. छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या मुलीसोबत त्याचे कॉलेजमध्ये प्रेम जुळले होते. घरच्यांची परवानगी घेतल्यानंतर त्यांनी लग्न केले होते. लग्नानंतर रोशन कुटुंबियांसह मूळ गावी आला होता. इथेच त्यांनी पूजेसोबत रिसेप्शनचे आयोजन केले होते. मंगळवारी रोशन पूजेचे सामान आणण्यासाठी बाईकवर गेला होता. मात्र तो परतलाच नाही. रोशनसोबत यावेळी त्याची आईदेखील होती. मात्र त्यावेळी समोर येणाऱ्या बाईकने त्याला धडक दिली. यावेळी रोशनने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे त्या गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.