काय सांगता! तिसरीतलं पोरगं शिकवतंय दहावीच्या मुलांना..., `छोटे खान सर` व्हायरल
तिसरीतला पठ्ठ्या दहावीच्या पोरांना शिकवतो
Khan Sir Jr: भारतात टॅलेंटची (Indian Talent) काहीच कमतरता नाही. जगातील मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत देखील भारतीयांचीच हवा आहे. खेड्यापाड्यातून अनेक हुशार विद्यार्थी देशपातळीवर नाव गाजवतात. त्यातील अनेकांना आयुष्यात मोठं काम करण्याची संधी देखील मिळते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात कामाची संधी मिळाल्याने सोनं देखील होतं.
थ्री इडियट्स मधील राँचो (Three Idiots Rancho) सर्वांनाच माहिती असेल. लहान वयात मोठ्या पोरांचा गृहपाठ करताना राँचो पुढे मोठा होऊन मोठा इंजिनियर झाला. असाच एक राँचो सध्या चर्चेत आहे. पटनामधील एक तिसरीत शिकणारा चिमुकला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसताना दिसतोय. पटनाची लोकं त्याला 'छोटा खान सर' (Khan Sir Jr) म्हणून ओळखत आहेत.
बॉबी राज (Bobby Raj) हा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी, पाटणा जिल्ह्यातील मसौधीच्या चापोर गावात 'छोटे खान सर' म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेला बॉबी कोणतंही गणित क्षणात सोडवतो. त्याला दहावीपर्यंतचा गणिताचा अभ्यासक्रम देखील तोंडपाठ आहे.
काही दिवसांपूर्वी पटनामधील खान सर प्रसिद्धीस आले होते. पटनाचे लोक खान सरांना गणिताचे जादूगर म्हणतात. बॉबी तिसरीत शिकत असला तरी तो दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देतो. गणिती फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे याचा सराव दहावीच्या विद्यार्थ्यांकडून बॉबी करून घेतो. बॉबीचे वडिल शिक्षक असल्याने बॉबीने आपल्या वडिलांकडून ही कला अवगत करून घेतली.
'25 लाख नकोत, आरोपींना मृत्युदंड द्या', पीडितेची वडिलांची सरकारकडे मागणी
दरम्यान, बॉबीला आणखी शिकून नाव कमवण्याची इच्छा आहे. बॉबीला गणित शिकण्याची प्रचंड आवड आहे आणि तो तिच्या बहिणीकडून आणि वडिलांकडून वारंवार मार्गदर्शन घेतो.