मुजफ्फरपूर : बिहारमधील मुजफ्फरपूर येथील सरकारी रुग्णालयात नसबंदी केल्यानंतरही दोन वर्षांनी एक महिला गर्भवती राहिली असल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील मोतीपूर येथील फुलकुमारीला चार मुले आहेत. तिला पाचवे बाळ नको होते. परंतु  काही दिवसांपूर्वीच असे लक्षात आले आहे की, ती गर्भवती आहे.  यावरून लक्षात येते की बिहारमधील आरोग्यसेवेचे तीन तेरा वाजले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा गर्भवती राहिल्यामुळे संबधीत महिलेने मुजफ्फरपूर ग्राहक न्यायालयात आरोग्य विभागाच्या विरोधात बेजबाबदारपणाची तक्रार केली. तसेच शासनाकडे 11 लाख रुपये इतकी भरपाईची मागणी केली आहे. ही महिला या बाळाच्या पोषणाची जबाबदारी घेण्यास अजिबात तयार नाही. महिलेच्या तक्रारीची दखल घेत यासंबधीची सुनावणी 16  मार्च रोजी होणार आहे.


जनसंख्या नियंत्रणासाठी (Population Control) सरकारी आरोग्य सेवेद्वारा नसबंदी केल्यास प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते. परंतु मुजफ्फरपूरच्या खळबळजनक घटनेमुळे आता या महिलेला न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आरोग्य विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आता प्रशासन काय कारवाई करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.