राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर आकासा उड्डाण घेणार का लॅडींग? वाचा सविस्तर बातमी
राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे.
Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातील (stock market) बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन (Death of Rakesh Jhunjhunwala) झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 2-3 आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. राकेश झुनझुनवाला यांची गणना देशातील अब्जाधीश लोकांमध्ये केली जाते. दरम्यान राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. मात्र राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर Akasa Air काय होणार? त्यांचे एकूण शेअर आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया...
शेअर मार्केटमध्ये मोठा दबदबा असणारे आणि बाजाराचे बिग बुल म्हणून ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांनी एअरलाइन्स सेवा क्षेत्रात प्रवेश केला होता. आकाशा एअरलाइन्सने 7 ऑगस्ट रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान आकाशात पहिले उड्डाण घेतले. ज्याचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झाले. 22 जुलै रोजीच, आकासा एअरलाइन्सने अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई आणि कोची येथे सुरुवातीच्या नेटवर्कसह पहिल्या व्यावसायिक फ्लाइटसाठी तिकीट बुक करणे सुरू केले . दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्ससाठी सुमारे २४७.५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अकासा एअरलाइन्ससाठी अनुभवी लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. ज्यात इंडिगोचे माजी सीईओ आदित्य घोष आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांचा समावेश आहे.
आकासा एअरलाइन्समध्ये कोणाची हिस्सेदारी?
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे अकासा एअर शेअरमध्ये सर्वाधिक भागीदारी आहे. या विमान कंपनीची एकूण भागीदारी 45.97 टक्के आहे. याशिवाय विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भातकुली, पीएआर कॅपिटल व्हेंचर्स, कार्तिक वर्मा हेही आकासा एअरचे प्रवर्तक आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर विनय दुबे यांची यात 16.13 टक्के भागीदारी आहे. अकासा एअरने 13 ऑगस्टपासून बेंगळुरू-कोची सेवा सुरू केली आहे. त्याच वेळी, ते 19 ऑगस्टपासून बेंगळुरू-मुंबई आणि 15 सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबईसाठी आपली सेवा सुरू करेल.