मुंबई : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावहून आलेले, कोरोनासारखी लक्षणं असणारे अनेकजण सध्या रक्त तपासणीसाठी रांगा लावत आहेत. कोरोनाचे तात्काळ निदान होणे हा आजच्या घडीचा मोठा प्रश्न आहे. जगभरासह भारतातही अनेक ठिकाणी यावर संशोधन सुरु आहे. यामध्ये देशातील पहिली आनुवंशिक आणि सूक्ष्मजीव तपासणी करणारी संस्था बायोनला  (Bione) यामध्ये यश आले आहे. त्यांनी भारतातील पहिले 'रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट' बाजारात आणले आहे. हे किट वापरायला अगदी सोपे असून काही मिनिटातच आजाराचे निदान होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ते कळण्यास मदत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोव्हिड-१९ स्क्रीनिंग टेस्ट किट हे एक आयजीजी व आयजीएमवर आधारीत साधन असल्याने निदान करण्यासाठी याला ५ ते १० मिनिटे इतका वेळ लागतो. 


हे किट मिळाल्यानंतर यूझरने आपले बोट अल्कोहलने स्वच्छ करून त्यातून रक्त घेण्यासाठी किटसोबत दिलेल्या लँसेटचा वापर करावा. सोबत दिलेले कार्ट्रिएज रक्ताच्या नमून्याची तपासणी करते आणि अशा प्रकारे ५ ते १० मिनिटात तपासणीचा निकाल मिळतो असे बायोनचे सीईओ डॉ. सुरेंद्र चिकारा यांनी सांगितले.