मुंबई: तमिनाडूतील कुन्नूर इथे सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची मोठी दुर्घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 12 जण होते. भीषण अपघातात 13 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. 


संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत याआधी देखील एक हेलिकॉप्टर क्रॅश घटनेतून अगदी थोडक्यात बचावले होते. 3 फेब्रुवारी 2015 मध्ये धक्कादायक घटना घडली होती. नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यात हेलिपॅडवरून बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर उड्डाण करणार होतं. सकाळी 9 ते 10 ची वेळ होती. 


CDS बिपीन रावत यांच्यासह पत्नीचाही दुर्दैवी अंत; दोन मुलींनी गमावला मोठा आधार


लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन लष्करी जवान होते. हेलिकॉप्टरनं नुकतंच उड्डाण केलं होतं. मात्र जमिनीपासून साधारण 20 फूट उंचावर जाताच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या अपघातात जवान जखमी झाले. या भीषण दुर्घटनेतून थोडक्यात बिपीन रावत बचावले होते. 


काळ आला होता पण तेव्हा वेळ आली नव्हती असं तेव्हा घडलं होतं. आज मात्र अचानक हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत बिपीन रावत यांना मृत्यूनं गाठल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संरक्षण दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज हेलिकॉप्टर अपघातात सेना प्रमुख बिपीन रावत आणि त्यांची पत्नीचंही निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे रावत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


CDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल


तमिळनाडूमध्ये भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना


 MI-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथे हेलिकॉप्टर कोसळलं. आतापर्यंत 13 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व मृतदेहांची DNA टेस्ट द्वारे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. 


6 वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर क्रॅशमधून बचावले होते संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत


CDS बिपीन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंगटन इथं एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले होते. वेलिंग्टनमध्ये लष्कराचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. पण कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.