नवी दिल्ली : डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.


भारतातूनही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, गेल्या काही आठवड्यांपासून बिटकॉइनमध्य गुंतवणूक करणारी मंडळी आयकर विभागाच्या रडारावर होती. त्यामुळे आयकर विभागाने या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील नऊ मोठ्या एक्चेंजर्सचा सर्व्हे केला होता. त्यानुसार या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, करचोरीला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने ही कारवाई केल्याची सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातूनही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. हा आकडा जवळपास काही कोटींमध्ये आहे.


बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक - आरबीआय


दरम्यान, आरबीआयने म्हटले आहे की, 'गेल्या काही काळापासून व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ आणि इनिशियल कॉईन ऑफरिंग (ICO) यांच्यात मोठी वृद्ध झाली आहे. ही वृद्धी पाहून आम्हाला चिंता वाटते. महत्त्वाचे असे की, बिटकॉईन हा रिझर्व्ह बँक निर्धारीत करत नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून बिटकॉईनचा भाव चांगलाच वधारला आहे.


बिटकॉईनला कायदेशीर आधार नाही


रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले होते की, 'पेमेंटसाठी बिटकॉनसह कोणत्याही प्रकारची व्हर्च्युअल करन्सीची निर्मिती, देवाण-घेवाण आणि वापर कोणत्याही प्रकारे केंद्रीय बँक अथवा सरकारककडून अधिकृत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे हा व्यवहार कायदेशीर नाही. व्हर्च्युअल करन्सीसाठी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वॉलेट्सचा वापर केला जातो. जे सहजपणे हॅक केले जाऊ शकते. यात पासवर्डची चोरी, विश्वासघात, फसवणूक अशा घटना घडू शकतात त्यामुळे असे व्यवहार करताना काळजी घ्या', असेही आरबीआयने म्हटले आहे.