Assembly Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुर या पाच राज्यांतील चित्र आता जवळपास स्पष्ट होत चाललं आहे. पाच राज्यांपैकी 4 राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.  403 जागांपैकी भाजपने तब्बल 263 जागांवर आघाडी घेतली आहे. 


उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. भाजप 263 जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 101 जागांवर आघाडीवर आहे. बसपा आणि काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. बसपा 5 तर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.


मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर कुशीनगरच्या फाजिलनगर विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार सुरेंद्र कुशवाह 4500 मतांनी आघाडीवर आहेत, तर सपा उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत.


गोव्यात भाजप आघाडीवर
गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. आताच्या कलानुसार भाजपने गोव्यात मुसंडी मारली आहे. 40 पैकी 18 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 13 जागांवर आहे. मगोप 4 आणि आपला इथं 1 जागा मिळताना दिसतेय.


गोव्यात 40 जागांसाठी झालेलया निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. येथे भाजप 18, काँग्रेस 16 आणि टीएमसी 3 जागांवर आघाडीवर आहेत. सत्तेसाठी 21 जागा आवश्यक असून येथे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ही गोव्याची सर्वात जुनी प्रादेशिक शक्ती, किंगमेकर म्हणून पुन्हा उदयास आली आहे. 


उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत
उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत एकूण 70 जागांपैकी भाजपाने तब्बल 42 जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. इथं काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून काँग्रेसला 14 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. उत्तराखंडमध्ये बहुमतामुळे भाजप नेते खूश असून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे


मणिपुरमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष
मणिपुरमध्येही भाजपने सत्तेसाठी आपला दावा मजबूत केला आहे. मणिपूरमध्ये 60 जागांपैकी 25 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) 4, एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी) 11  आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे.


पंजाबमध्ये आप सुसाट
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पंजाबमधील एकूण 117 विधानसभा जागांवर अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आम आदमी पार्टीची रथ तुफान वेगाने आघाडी घेत आहे. आम आदमी पार्टीला तब्बल 88 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. 
 
गेल्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळा 16 जागांवर समाधान मानावं लागतंय तर अकाली दल 8 जागांवर, भाजप 3 जागांवर आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.