जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश
जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती. कारण मोदी सरकारने कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे मोठे षडयंत्र रचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हे पाहायला मिळेल. जम्मू-काश्मीरमधील पहिल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यातील एकूण 280 जागांपैकी 277 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की काश्मीरचे राजकीय वातावरण आता पूर्णपणे बदलले आहे. महत्त्वाचं म्हणजे 277 पैकी 76 जागा भाजपने जिंकल्या आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्सने 67, अपक्ष 49, पीडीपी 27, काँग्रेस 26, जेकेएपी 12, जेकेपीसी 8, सीपीआयएम 5, जेकेपीएम 3, जेकेएनपीपी 2 आणि पीडीएफ 2 आणि बसपाला एक जागा मिळाली आहे. दहशतवाद आणि हवामानाचे आव्हान असूनही मतदारांचा उत्साह आणि लोकशाहीबाबत असलेला विश्वास लोकांनी दाखवला. नवीन जम्मू-काश्मीर आता विकासासाठी प्रयत्नशील आहे.
कडक सुरक्षेत मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व २० जिल्ह्यांमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला, जो बुधवारी दुसर्या दिवशीही सुरू राहिला आणि केवळ तीन जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे.
पक्षाचे नाव - जागा - मतदान
भाजप 76 4,87,364
नॅशनल काँफ्रेंस 67 2,82,514
अपक्ष 49 1,71,420
पीडीपी 27 55789
काँग्रेस 26 139382
जेकेएपी 12 38147
जेकेपीसी 8 43274
सीपीआइएम 5 6407
जेकेपीएम 3 6754
जेकेएनपीपी 2 12137
पीडीएफ 2 7273
बीएसपी 1 7397