नवी दिल्ली : केंद्र सरकारने 28 सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल स्ट्राइक डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरला भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय जवानांनी पीओकेमध्ये जाऊन दहशतद्यांचा खात्मा केला होता. 


सर्जिकल स्ट्राईक डे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जवानांनी 28-29 सप्टेंबर 2016 ला पाकिस्तान व्याप्त काश्मिरात ही मोठी कारवाई केली होती. जवानांनी या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या सेनेला उरी हल्ल्याचं उत्तर दिलं होतं. जो 18 सप्टेंबरला झाला होता. ज्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले होते.


सर्जिकल स्ट्राईक डे या दिवशी सगळे मंत्री आणि भाजपचे खासदार-आमदार आपल्या भागात कार्यक्रमांचं आयोजन करणार आहेत. यातून ते भारतीय जवानांचा सन्मान करणार आहेत. मीडिया रिपोर्टसनुसार मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


मेडिकल कॅम्प 


सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताचं सरकार आपल्या संरक्षणासाठी काहीही करु शकतं हे त्यांनी दाखवून दिलं होतं. 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान मागासलेल्या भागात मेडिकल कॅम्प लावले जाणार आहेत. 17 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो आणि 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिवस आहे. 


काव्याजंली दिन


सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर त्यांच्या आठवणीत सरकार 16 सप्टेंबरला काव्याजंली दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी मंत्री आणि आमदार आपल्या भागात कवी संमेलनाचं आयोजन करतील. ज्यामध्ये वाजपेयींच्या कविता देखील सादर केल्या जातील.