मुंबई : 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही जातीय रंग देऊ नका. एवढंच नव्हे तर कुणीही कोणतेही 'विभाजन किंवा मतभेद' निर्माण करण्यास उदयुक्त करणारी विधान करू नका,' अशी माहिती  भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमानंतर कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कार्यक्रमानंतर ४०० पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाली आहे तर १५ कोरोनाग्रस्त रूग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 


गुरूवारी संध्याकाळी झालेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले. 'कोणत्याही पक्ष कार्यकर्ता किंवा नेत्याने कोणतंही भडकावू आणि फूट पाडणार वक्तव्य किंवा टीका करू नये. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच इतर राज्यातील सरकारला पाठिंबा द्यावा. मग तेथे कोणत्याही पक्षाची सत्ता असू दे.'


आपल्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी आहे. विषाणू आणि रोगाने जगभरातील प्रत्येकाला असुरक्षित बनविले आहे, अशावेळी आपण जबाबदारीने वागायला हवं असं नड्डा यांनी उपस्थितांना सांगितलं. 

तबलिगीचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा याचा पुनरुच्चार केला गेला. कोणीही याला जातीय मुद्दा बनवू नये, असे निर्देश आहेत. अल्पसंख्याक समुदायाचे नेते त्यांना हवे असल्यास त्यावर भाष्य करू शकतात. विषाणूंविरूद्धच्या आपल्या लढाईत आपल्याला संघटित असले पाहिजे, असं देखील नड्डा यावेळी म्हणाले. 


पक्षाच्या अनेक समर्थकांनी, विशेषत: सोशल मीडियावर, “कोरोना जिहाद,” आणि “मार्काझ षडयंत्र” यासारख्या मोहिमेचा उद्रेक झाल्याचे नमूद केले आहे. या गोष्टी टाळण्याचे जे पी नड्डा यांनी सांगितले.