२०१९ मध्ये भाजपला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळेल - अमित शाह
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला पसंत नाही करत. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला पसंत नाही करत. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अमित शाह यांनी कार्यकारणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, भाजप 2019 च्या निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा मोठे विजय मिळवेल असा दावा केला आहे. ते म्हणाले की आम्ही भ्रष्टाचारमुक्त आणि जातीवादमुक्त भारत बनवण्याचा संकल्प घेतला आहे.
पीयूष गोयल यांनी 'सुभाग्य योजनेचा उल्लेख करत म्हटलं की, पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाला की, मोदी सरकार मे 2018 पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 'सुभाग्य योजना' लाँच करु शकतात. या योजनेवर केंद्र सरकार 17,000 करोड़ रुपए खर्च करणार आहे.
गुजरातसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि 2019 लोकसभा निवडणुकीची दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत. असे मानले जाते की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी धोरणात्मक घोषणा करू शकतात. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणाने बैठकीची सुरुवात झाली तर सांगता नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे.