नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. सर्व सामान्य जनतेपासून ते दिग्गज व्यक्तींना देखील या महामारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या  राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत. 



दरम्यान मुख्यमंत्री गहलोत यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. 'आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झालं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.' असं ट्विट त्यांनी केलं आहे.