मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलश रथावर भाजपच्या एका नेत्याचे फोटो सेशन व्हायरल होतंय. शहराचे उपमहापौर विजय औताडे यांचे हे फोटो आहेत. अस्थीकलसच्या रथावर औताडे हास्य विनोदात रंगले. धम्माल करत सेल्फी काढत असल्याचे त्यांच्या फोटोत दिसतंय.


फोटो व्हायरल  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हे फोटा व्हायरल झालेत. श्रद्धांजली सभेत अटलजींचा अपमान केला म्हणून मतीनला मारहाण करण्यात विजय औताडे पुढे होते. आता सेल्फी सेलिब्रेशन करून औताडे महाशयांनी नक्की काय साजरं केला हाही प्रश्न आहेच. 


काय कारवाई होणार ?


विजय औताडे आता अस्थिकलश यात्रेसोबत असल्याने ते प्रतिक्रीया द्यायला उपलब्ध नाहीत. औताडेंच्या या सेल्फीप्रेमामुळे भाजपाचे नेते अडचणीत आले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करण्यामध्ये विजय औताडे हे आघाडीवर होते.


अटलजींचा अपमान केला म्हणत सर्व भाजपा नेते त्याच्यावर तुटून पडले होते. आता विजय औताडेंवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.