BJP Leaders Added 3 Letters In Their Social Media Name: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. माझ्या कुटुंबावरुन माझ्यावर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. मात्र आता संपूर्ण देश सांगतोय की मी मोदीच्या कुटुंबातील आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर आता अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावात बदल करत त्यामध्ये मोदींच्या नावाचा समावेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय दळण-वळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावात बदल केला आहे.


लालू प्रसाद यादव यांनी केलेली टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यातील गांधी मैदानामध्ये आयोजित सभेमध्ये पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मोदींच्या खासगी आयुष्यावरुन लालू प्रसाद यादव यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. "कोण आहेत मोदी? मोदी कोणीच नाहीये. मोदींकडे तर त्यांचं कुटुंबही नाहीये. अरे तुम्ही सांगा ना तुमच्या कुटुंबात कोणतंही मूल का नाही? जास्त मुलं असलेल्यांना बोलतात की परिवारवाद करतात. कुटुंबासाठी लढतात," असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते. 


जोडली ही 3 अक्षरं


लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या या टीकेवरुन मोदींनी त्यांच्या खास शैलीत लालू यांना उत्तर दिला. मोदींनी तेलंगणमधील सभेतून निवडणूक प्रचारासंदर्भात नवीन घोषणाच दिली. आता त्यावरुनच केंद्रीय मंत्र्यांनी आपली नावं सोशल मीडियावर बदलली आहे. आपल्या नावापुढे अनेक नेत्यांनी 'मोदी का परिवार' ही ती 3 अक्षरं जोडली आहेत. अनेक नेत्यांनी आपल्या प्रोफाइलमध्ये नाव बदललं आहे. पाहूयात यापैकीच काही स्क्रीनशॉट...



त्यांच्या नजरेतच तुकडे


दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी विरोधकांच्या नजरेतच तुकडे करण्याची वृत्ती आहे असं म्हणत लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. तसेच संपूर्ण देश मोदींचं कुटुंब आहे. विरोधकांना मात्र त्यांच्या कुटुंबियांनाच मोठं करायचं आहे, असं म्हणत सुधांशु त्रिवेदींनी विरोधकांवर निशाणा साधला.



2019 मध्ये 'मैं हूँ चौकीदार' 


2019 साली पंतप्रधान मोदींबरोबरच सर्व केंद्रीय मंत्र्यांनी 'मैं हूँ चौकीदार' अशी घोषणा दिली होती. सर्व मंत्र्यांनी त्यावेळेस आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या पुढे 'मैं हूँ चौकीदार' असं लिहिलं होतं.