नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, सर्व एक्झिट पोल गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचे संकेत दर्शवत आहेत. परंतु एक्झिट पोल अंतिम परिणाम नाही, हे फक्त एक अंदाज आहे. अशा परिस्थितीत जर निवडणुकीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असतील किंवा समान जागा मिळाल्या तर कोणत्या प्रकारच्या धोरणांचा अवलंब केला जाईल, या बैठकीत या विषयावर चर्चा होत आहे.


बैठकीत दिग्गज नेते


अमित शाह यांच्यसोबतच राम लाल, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन, प्रकाश जावडेकर आणि मीनाक्षी लेखी देखील या बैठकीत उपस्थित आहेत. एवढेच नाही तर, पक्ष प्रवक्ते देखील बैठकीत सहभागी आहेत. कारण निवडणूक निकालाबरोबरच प्रवक्त्यांना पक्षाची धोरणे पुढे ठेवावी लागतात. सर्व वृत्तवाहिन्यांवर पक्षाची धोरणं प्रवक्ते मांडतात.


तीन स्तरांवर योजना तयार


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत नेत्यांना तीन स्तरांसाठी तयार राहण्याची तयारी केली जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर पक्षाला खात्रीशीर विजय मिळत असेल तर पुढे काय म्हणायचं. जर भाजप आणि काँग्रेसला समान जागा असतील तर मग पुढील काय संदेश द्यायचा. आणि जर निवडणुकीत भाजप पराभूत होत असेल तर याचा सामना कसा करायचा याबाबत चर्चा सुरु आहे. अमित शाह निवडणुकीच्या निकालांनंतर पक्षामध्ये दोन प्रकारचे प्रवाह दिसू नये म्हणून याबाबत बैठक घेत आहेत.


सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी केली जाईल. गुजरात नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला आहे. तर काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील ही परीक्षा असणार आहे.