नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी आता अडीच वर्ष शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने यूपीवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीतील ज्या जागांवर २०१४ मध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्या जागांवर भाजप जोर लावण्यासाठी सज्ज झाली आहे. या जागांवर भाजप सभा आणि संघटन कार्यक्रम सुरू करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप सर्वातआधी अमेठीमधून भाजप आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची योजना आखत आहे. 


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, भाजप अध्यक्ष अमित शाह या संदर्भात आराखडा आखण्यासाठी १० ऑक्टोबरला अमेठीला जातील. याबाबतीत एका भाजप नेत्यांनी सांगितले की, ज्या सात जगांवर गेल्यावेळी पक्ष पराभूत झाला, त्यात सर्व जागांवर पक्ष कार्यक्रम सुरू करणार आहे. गेल्यावेळी या जागांवर कॉंग्रेस आणि सपाने विजय मिळवला होता. 


२०१४ मध्ये यूपीच्या या सात जागांवर अमेठीतून आणि रायबरेलीतून सीटवर क्रमश: राहुल गांधी आणि सोनिया गांधी विजयी झाले होते. इतर पाच जागांवर सपा विजयी झाले होते. सपाकडून मुलायम सिंह यादव(आझमगढ), डिंपल यादव(कन्नौज), तेज प्रताप यादव(मॅनपुरी), धर्मेंद्र यादव(बदायू) आणि अक्षय यादव(फिरोजाबाद)वरून विजयी झाले होते.