सत्ताधारी भाजपच्या महिला आमदार विधानसभेत ढसाढसा रडल्या
मंत्री त्रास देत असल्याने सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांना रडू कोसळले. आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
भोपाळ : सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांवर स्वमंत्र्यांच्या त्रासामुळे सुरक्षितेची मागणी करण्याची वेळ आली. सरकारमधील उद्योगमंत्री आपल्याला त्रास देत आहेत. त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, उद्योगमंत्र्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, भाजपच्या स्वमंत्र्यांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्यामुळे विधानसभेत या महिला आमदार ढसाढसा रडल्या.
मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपच्या महिला आमदार नीलम मिश्रा यांना रडू कोसळले. आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. यावर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी नीलम मिश्रा यांना सुरक्षेचं आश्वासन दिले. विधानसभेचं कामकाज सुरू असताना रिवा जिल्ह्यात सेमरिया मतदारसंघातील भाजपच्या आमदार असलेल्या नीलम मिश्रा या उभ्या राहिल्या आणि बोलू लागल्या. मंत्री राजेंद्र शुक्ल हे आपला छळ करत असल्याचं सांगत त्या ढसाढसा रडल्या. भर सभागृहात महिला आमदार रडू लागल्याने वातावरण एकदम गंभीर झाले. विधानसभा सभापती यांनी महिला आमदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना बसण्यास सांगितले. मात्र, पण सुरक्षेचं आश्वासन मिळाल्याशिवाय आपण बसणार नाही. त्याचेवळी आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आमदार नीलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा आणि मंत्री राजेंद्र शुक्ल यांच्यात आधीपासून वाद आहे. त्यामुळे मिश्रा यांच्या तक्रारीमागे हे एक कारण असू शकते, असे बोलले जात आहे. अभय मिश्रा हे रीवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष आहेत. ते यापूर्वी भाजपमध्ये होते. पण दोन वर्षापूर्वी सरकारविरोधातील आंदोलनात भाग घेत ते काँग्रेसमध्ये गेले. तसंच राजेंद्र शुक्ल यांनी अभय मिश्रांविरोधात अनेकदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता या घटनेनंतर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.