Kanaga Ranaut Security : हिमाचल प्रदेशमधल्या मंडी मतदार संघातून निवडून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर (Chandiarh Airport) तिथल्या महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कानशिलात लगाणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक कुलविंद कौरला (Kulwinder Kaur) निलंबित करण्यात आलं असून तिची चौकशी केली जाणार आह. पण यानंतर निमित्ताने व्हीव्हीआयपींना दिलेल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थवरही प्रश्नचिन्हा उपस्थित झालं आहे. कंगना रनौत भोवती सुरक्षेचं कडं असतानाही ही घटना कशी घडली याबाबत प्रश्न विचारला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉडीगार्ड्स काय करत होते?
कंगनाला चंदीगड विमानतळावर कंगना रनौतला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओत कंगना सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत विमानतळावर चेक इनसाठी जात असताना तिथे असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाने अचानक कंगनावर हल्ला केला. यावेळी तिचे बॉडिगार्ड्स तिच्या आसपास नसल्याचं व्हिडिओत दिसतंय.


कंगला Y+ दर्जाची सुरक्षा
कंगना रनौतला गृह मंत्रालयाद्वारे 2020 मध्ये वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मुंबई आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यावेळी कंनगा रनौतने केला होता. त्यानंतर कंगनाच्या सुरक्षेत 11 कमांडो तैनात करण्यात आले. देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. देशातील राजकीय नेते आणि महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्याप्रमाणे त्यांना Y, Y+, Z किंवा Z+ सुरक्षा दिली जाते. 


कोणाला मिळते सुरक्षा?
पंतप्रधान, राष्ट्रपदी, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार यांच्याशिवाय अधिकारी, व्यापारी, क्रिकेटर्स, बॉलिवूड स्टार्स, संत किंवा काही वेळा धोका असणाऱ्या सामान्य माणसालाही सुरक्षा प्रदान केली जाते. देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. ज्या व्यक्ती देशासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत किंवा ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते. वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा असते. भारतात पाच प्रकारच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आहे. यात Z+, Z, Y+, Y आणि X श्रेणीचा समावेश आहे. 


VIP सुरक्षा कोण पुरवते?
भारतात व्हीव्हीआयपींना अनेक संस्थांद्वारे सुरक्षा पुरवली जाते. यात  एसपीजी (SPG), एनएसजी (NSG), आईटीबीपी (ITBP) आणि सीआरपीएफ (CRPF) सारख्या सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी सरकारला अर्ज द्यावा लागतो. यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून त्या व्यक्तीला असलेल्या धोक्याचा अंदाज घेताल जातो, त्यानंतरच संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते. गृहसचिव आणि महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती कोणत्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय घेते.