मुंबई : सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार असून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 



डॉक्टर श्रेयशी निशंक शनिवारी अधिकृतरित्या कॅप्टन आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाली आहे. श्रेयशी आता रुडकीयेथील सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहे. 



सैन्याच्या हॉस्पिटलमधील कार्यक्रमात वडिल रमेश पोखरियाल यांनी मुलगी श्रेयशीला स्टार लावून कॅप्टनच्या रुपात सन्मान केला. हा फोटो पोखरियाल यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केली.



खासदार आणि त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. खासदाराच्या मुलीचे हे कतृत्व सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे.