नवी दिल्ली : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या वादात सावध भूमिका घेत भाजपने काढता पाय घेतला आहे. शिवाजी महाराजांची तुलना ही कुणाशीच होवू शकत नाही, हे जे पुस्तक प्रकाशित झाले आहे, त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. भाजपाच्या कार्यक्रमाचा तो भागही नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित लेखकाने माफी मागितली आणि ते पुस्तकंही मागे घेण्यात आल्याने, हा वाद आता संपल्यात जमा असल्याचं ट्वीट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.


शिवाजी महाराज हे एक महान राजे होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. शकानुशतके त्यांची प्रेरणा आजही कायम आहे. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होवू शकत नाही, असं ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.


संबंधित पुस्तकाच्या शिर्षकावरून शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची वादग्रस्त तुलना याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पुस्तकाचे लेखक हे भाजप नेते जयभगवान गोयल आहेत. 


जयभगवान गोयल हे वादानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम होते, मात्र आता प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून लेखकाने माफी मागितली असल्याचं स्पष्ट केलं आहे.