नवी दिल्ली :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करत पलटवार केला आहे. अमित शहा हे उत्तर कर्नाटकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.


मतदारांची होतेय करमणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने राजकीय हवा चांगलीच तापली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप हे प्रमुख पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. अमित शहा यांच्या उत्तर कर्नाटक दौऱ्यातही याचा प्रत्यय मतदारांना आला.


अमित शहांचा प्रतिप्रश्न


कर्नाटकमधील एका सभेत बोलताना राहुल गांधींनी चार वर्षांच्या काळात काय केले असा सवाल भाजप प्रणीत मोदी सरकारला विचारला होता. या प्रश्नावर प्रत्युत्तर देताना अमित शहांनी राहुल यांची नक्कल करत प्रतिसवाल केला. ते म्हणाले, राहूलजी, आपण चार वर्षातला हिशोब आम्हाला मागता. कर्नाटकची जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे.