नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी त्यांची सातवी यादी जाहीर केली. यामध्ये छत्तीसगड, तेलंगणा, मेघालय आणि महाराष्ट्रातल्या ९ उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. यातले ६ उमेदवार हे छत्तीसगडचे आहेत. छत्तीसगडमध्ये राजनांदगावमधून संतोष पांडे, रायपूरमधून सुनील सोनी, विलासपूरमधून अरुण साव, दुर्गमधून विजय बघेल, कोरबामधून ज्योती नंद दुबे यांना तिकीट देण्यात आलं आहे. पण या यादीतून भाजपने माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांना मोठा झटका दिला आहे. यावेळी रमणसिंग यांच्या कुटुंबातून कोणालाही तिकीट देण्यात आलेलं नाही. रमणसिंग यांचा मुलगा संतोष सिंग याआधी राजनांदगावमधून खासदार होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकीट जाहीर करण्याआधीच भाजपने स्पष्ट केलं होतं की यावेळी सगळ्या खासदारांना तिकीट मिळणार नाही. राजनांदगावमधून भाजप संतोष सिंग यांना तिकीट देण्याऐवजी खुद्द रमणसिंग यांनाच तिकीट देतील, अशी शक्यता होती. पण भाजपने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि संतोष पांडे यांना उमदेवारी दिली.


याआधी भाजपने शनिवारी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत भाजपने एकूण ३०६ उमेदवारांची घोषणा केली आहे.