नवी दिल्ली :  कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी भाजप आणि संघाला फैलावर घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मायावती यांनी म्हटले की, ही घटना घडली आहे. ती थांबवता आली असती. सरकार या ठिकाणी योग्य ती सुरक्षा प्रदान करायला हवी होती.  या ठिकाणी भाजपचे सरकार आहे आणि त्यांनी हिंसा घडवून आणली आहे. असे वाटते की यामध्ये भाजप-संघ आणि जातीवादी शक्तींचा हात आहे. 



यापूर्वी कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचार प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली होती.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे दलितविरोधी असल्याचं भीमा-कोरेगावच्या घटनेवरून सिद्ध झालं आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. दलित हे भारतीय समाजात तळालाच राहावेत ही संघ आणि भाजपची विचारधारा आहे. उना, रोहित वेमुला आणि आता भीमा कोरेगाव हे याचं उदाहरण आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.