भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये निवडणुक प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांविरोधात टीकेची राळ उडवीत आहेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मध्यप्रदेशमध्येही आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश येथील एका सभेत 'लडकी हूं लढ सकती हूं' असे विधान केलं होतं. हे त्यांचं घोष वाक्य प्रचंड गाजत आहे. यातच त्यांनी या निवडणुकीत ५० महिलांना उमेदवारी दिल्यानं वातावरण प्रियंका यांच्या बाजून झुकलं आहे.


उत्तर प्रदेशच्या या घोषवाक्याला मध्यप्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांनी नवी घोषणा देत प्रत्युत्तर दिलंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात राज्यातील मुलींसाठी साक्षरता मोहिम सुरु झाली आहे. यावेळी शर्मा यांनी 'लडकी है तो पढ सकती है' असा जयघोष केला. 


शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री चौहान यांच्या या मोहिमेची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांना खोचक टोमणाही मारला. महिला साक्षरतेला साथ द्या, असे आवाहन करत 'लडकी है तो लढ सकती है', असे प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या घोषवाक्यात बदल करत 'लडकी है, तो पढ सकती है', असं यावेळी सांगितलं.