नवी दिल्ली : या वर्षाच्या शेवटापर्यंत तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. या तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे असणार आहे. अमित शाह केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री झाल्यानंतर पार्टी आता नवा अध्यक्ष शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण सध्या तरी या चर्चांना पुर्णविराम मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजपा पुढच्या काही दिवसांत सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरु करणार आहे. पार्टीचे संस्थापक सदस्य राहिलेल्या विचारक श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती 6 जुलैला हे काम सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. साल 2014 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. तर झारखंडमधअये 2014 नोव्हेंबरमध्ये झारखंडमध्ये निवडणुका झाल्या होत्या. अमित शाह यांनी तिन्ही राज्याच्या भाजपा प्रमुखांसोबत निवडणूक रणनिती संदर्भात बैठक केली आहे.