त्यावेळी मोदींची कामगिरी खास नव्हती, पण आता परिस्थिती बदललेय- आठवले
कोणी कितीही आंदोलने करावीत.
जयपूर: 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी गुजरात वगळता नरेंद्र मोदींनी विशेष काम केले नव्हते. मात्र, पंतप्रधान म्हणून गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर ते २०१९ मध्ये निवडणुकीला सामोरे जातील. तेव्हा भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले आहे. ते शनिवारी जयपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आठवले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. क्रिकेट व अन्य खेळांसह सैन्यभरतीमध्येही आरक्षण दिले पाहिजे. कोणी कितीही आंदोलने करावीत. पण एससी- एसटी व ओबीसींना मिळालेले आरक्षण बंद करता येणार नाही. सवर्णांमध्येही सगळेच श्रीमंत नसतील. त्यामुळे जातीय आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे, असे त्यांनी सांगितले.