अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापिठात मोहम्मद अली जिन्नाच्या फोटोबाबत पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. अलिगडच्या भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहले आहे. या पत्रात विद्यापिठातून जिन्नाचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाालाही सुपूर्द केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिगड मुस्लिम विद्यापिठाच्या युनियन हॉलध्ये मोहम्मद अली जिन्नाचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे अनेकदा वाद झाला आहे. आता 14 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अलिगड जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटला आहे.


देशाच्या विद्यापिठात जिन्नाचे काय काम
देशाची विभागणी करणाऱ्या मोहम्मद अली जिन्नाच्या फोटोचे विद्यापिठात काय काम? जिन्नाने भारताची विभागणी करून पाकिस्तान बनवला. धर्माच्या नावावर देश तोडला, त्यामुळे जिन्नाचा फोटो विद्यापिठात असू नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.


भाजप कार्यकर्त्यांची मागणी
विद्यापिठातून जिन्नाचा फोटो हटवावा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. जर प्रशासनाने जिन्नाच्या फोटोला विद्यापिठातून हलवले नाही. तर ते स्वतः हे काम करतील.


याआधीसुद्धा जिन्नाच्या फोटोवरून वाद निर्माण झाले आहेत. अलिगडचे भाजप खासदार सतीश गौतम यांनी हा फोटो काढण्यासाठी मोहिम सुरू केली होती. 


14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान ते जाट राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापिठाचे उद्घाटन करतील.  आता मोदींच्या दौऱ्याआधी जिन्नाच्या फोटोचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.