Maharashtra Pattern In Bihar:  बिहार विधानसभेच्या यावर्षी निवडणुका होणार आहेत. त्याअनुषंगानं बिहारचं राजकारण सध्या बरंच तापलंय. त्यात सध्या मुख्यमंत्री नितीशकुमारांना वेगळीच भीती वाटू लागलीय. महाराष्ट्रात 2022 मध्ये भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना नेतृत्वस्थानी ठेवून महायुतीनं निवडणुका जिंकल्या. मात्र भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यावर मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवलं. त्यामुळं आपलाही शिंदे होणार नाही ना अशी धास्ती आता नितिशकुमारांना वाटू लगालीय. त्यात अमित शाहांनी केलेल्या एका वक्तव्यानं नितिशकुमार नाराज झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय संसदीय बोर्ड आणि घटकपक्ष मिळून घेतील असं शाह म्हणाले. यांच्या एका वक्तव्यानंतर नितीश कुमार अस्वस्थ झालेत. यानंतर जेडीयूनंही "बिहारचा विचार केला तर नाव फक्त नितीश कुमारांचे" असे पोस्टर सर्वत्र झळकवले.  खरंतर बिहारच्या राजकारणात नितिशकुमार कधी काय निर्णय घेतील याचा कधीच नेम नसतो.  


बिहारमध्ये 2025 ला विधासनभा निवडणुका होऊ घातल्यात. त्यात एकनाथ शिंदेंप्रमाणं जागांच्या खेळात उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदरी पडू नये म्हणून नितीशकुमार आत्ताच सावध झालेत. त्यात आता लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांना एकत्र येण्याची ऑफर दिलीय. लालू, तेजस्वी यादव आणि नितीशकुमारांची चर्चाही झालीय. त्यामुळं नितीशकुमार पुन्हा महागठबंधनचा हात धरणार का याचीही चर्चा सुरू झालीय. 


तेव्हा बिहारमध्ये भाजपच्या महाराष्ट्र पॅटर्नची जोरदार चर्चा सुरुय. शिंदेंप्रमाणं आपलीही गत होऊ नये याची धास्ती नितीशकुमारांना आहे. त्याचवेळी, लालू यादवांचे आमंत्रण आणि भाजपचा दबाव, यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेणार का, यावर बिहारचं राजकीय भविष्य अवलंबून असेल. 


नितीश कुमारांच्या कोलांट उड्या


2015 - नितीश कुमार आणि राजदचं महागठबंधन. एनडीएचा विधासनभेत पराभव
दोनच वर्षात भाजपसोबत सरकार स्थापन
2020 - भाजपसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन
2022 - नितिशकुमारांची पुन्हा महागठबंधनसोबत सत्ता. 
सत्तेच्या कोलांटउड्यामुळे नितीश कुमारांची 'पलटूराम' म्हणून ओळख