Trending News In Marathi: एका घरात साप घुसला त्या सापाला घरातून हुसकावून लावण्यासाठी घरातील सगळेच धावले पण एका वृद्ध महिलेने मात्र सापाला वाचवले. कोणीही सापाला मारायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर सलग दोन दिवस साप महिलेचे जवळच फिरत होता. तर कधी महिलाही सापाला उचलून गळ्यात घालत होती. पण यामागचे कारण ऐकून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेच्या घरात साप घुसल्यानंतर तिने धावत जाऊन सापाला वाचवले व हाच माझा मेलेला मुलगा आहे जो सापाच्या रुपात परत आला आहे. असं म्हणत सलग दोन दिवस महिला या सापाला घेऊन फिरत होती. त्याचे लाड करत होती तर कधी गळ्यात घेऊन फिरत होती. मात्र दोन दिवसांनी या सापाचा मृत्यू झाला मग मात्र घरातील लोकांनी या सापाचे अंत्यसंस्कार केले. 


मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील कोटा येथील ही घटना आहे तर वृद्ध महिलेचे नाव बदाम बाई असं आहे. महिलेने म्हटलं आहे की, अचानक घरात साप आला तेव्हा सगळेच घाबरले. तेव्हा मी तिथे पोहोचल्यावर मी सापाला हात जोडून विनंती केली की तुम्ही इथून जा, आम्हाला घाबरवू नका. त्यानंतर तो हळहळू माझ्याजवळ येऊ लागला तेव्हा मी माझा पदर पसरवला व म्हटले, जर माझाच मुलगा असशील तर माझ्या कुशीत राहा. त्यानंतर मी त्याला दूध मागवून माझ्याच कुशीत त्याला दूध पाजले. त्यातनंतर मी जिथे जिथे जात होती तो माझ्या मागे येत होता. त्यानंतर तो घरासमोरच्या झाडीत जाऊन लपला. 


दुसऱ्या दिवशी पून्हा तो साप आला आणि शेतात बसून राहिला. तेव्हा मी त्याला माझ्या खांद्यावर बसवून घरी घेऊन आली. त्याला म्हटलं की माझा मुलगा असशील तर घरी येशील. या सापाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी व शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी गर्दी केली होती. त्याचे फोटो काढून सगळीकडे व्हायरल केले. मात्र, त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले, असं बदामबाईने सांगितले आहे. 


गावातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 15 वर्षांपूर्वी बदामबाई हिच्या मोठ्या मुलाचा पार्वती नदीन बुडून मृत्यू झाला होता. नदीत अंघोळ करत असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं या सापाच्या रुपात त्याचा पुर्नजन्म झाला असल्याचं बदामबाई आणि तिचे कुटुंब मानत होते. मात्र मंगळवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी शेतात त्याच्यावर अत्यंसंस्कार केले.