Black gold business: नोकरीत काही खरं नाही, विचार करतोय काहीतरी व्यवसाय करावा. तुमच्या आसपासच्या अनेकांनी तुम्हाला हे वाक्य ऐकून दाखवलं असेल. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्यांना हेच वाक्य बोलून दाखवलं असेल. मात्र नक्की कोणता व्यवसाय सुरु करावा हे समजत नसेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आसपासच्या प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला काहीनाकाही व्यवसाय करून मालामाल  व्हायचं असतं. मात्र नक्की कोणता व्यवसाय करावा हे समजत नसेल तर ही बातमी अजिबात चुकवू नका. कदाचित हा व्यवसाय तुम्हाला मालामाल करेल. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय सांभाळणं वाटतं तेवढं कठीण नाही. 


तुम्ही जर चांगला फायदा देणाऱ्या व्यवसायाच्या  शोधात असाल, तर तुम्ही मुर्रा जातीच्या म्हशींच्या पालनाचा व्यवसाय सुरु करू शकतात. मुर्रा जातीच्या म्हशी सर्वात चांगल्या मानल्या जातात. म्हणून त्यांची मागणीही जास्त असते. या जातीच्या म्हशी जास्त दूध देतात. म्हणूनच लोकं यांना काळं सोनं म्हणूनही  संबोधतात.


 



फायद्याबाबत बोलायचं झाल्यास मुर्रा जातीच्या म्हशीचं पालन करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. यासोबत, तुम्ही डेअरी संबंधित जोडधंदा देखील करू शकतात. या जातीच्या म्हशी दररोज 20 ते 30 तीस लिटर दूध देतात. यामुळे तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही या म्हशींचं व्यवस्थित संगोपन केलं तर त्यांची दूध देण्याची क्षमता वाढू शकते. 


या प्रकारच्या म्हशींना तुम्ही सहज ओळखू शकतात. यांचा रंग काळा आणि डोकं लहान असतं. यांच्या शरीराची बनावट मजबूत असते. यांची शिंगही विशिष्ठ प्रकारची असतात. इतर जातीच्या म्हशींपेक्षा या म्हशींची शेपटी जास्त लांब असते. 


तुम्हाला दुग्धव्यवसायासाठी यांचा वापर करायचा नसल्यास तुम्ही थेट मुर्रा जातीच्या म्हशींची खरेदी विक्री करूनही चांगले पैसे कमवू शकतात. या प्रकारच्या म्हशींना चांगली मागणी असल्याने तुम्हाला त्यामध्ये चांगला नफा होऊ शकतो. एका जातीच्या एका म्हशीची किंमत 2 लाखांपर्यंत आहे. 


black gold business for earning lot of money murrah buffalo dairy business