भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये `ब्लॅकआऊट`
पाकिस्तानमधील अर्ध्याहून अधिक भागात ब्लॅकआऊट
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेद्वारा पाकिस्तानात करण्यात आलेल्या कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानमध्ये प्रशासकीय पातळीवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तानातील कराची प्रशासनाने कोणत्याही प्रकारे येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरचा मोठा भाग, पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या आसपासचा परिसर, गिलगिट बाल्टिस्तानचा मोठा भाग, इस्लामाबादमधील ई सेक्टर, लाहौरमधील काही भाग, सियालकोट, कराची, पसनी कोस्ट लाइन आणि ओकारा परिसरात ब्लॅकआऊट ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसारात रात्री संपूर्ण काळोख ठेवण्याचे आदेश पाकिस्तानकडून देण्यात आले आहेत.
या परिसरांव्यतिरिक्त विमानतळही बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पख्तुनवा प्रांतातही पाकिस्तान प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानमधील अर्ध्याहून अधिक भागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांवर तीनही सेनेच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. मोदींनी सेनेला कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. आर्मी, नौसेना आणि वायुसेनेच्या प्रमुखांची मोदींशी गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा बैठक घेण्यात आली होती.
पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या तळांवर करण्यात आलेल्या भारतीय हल्ल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. एनएसएचे अजीत डोभाल आणि तीनही सेनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर सुरक्षा अधिकाऱ्यांची यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती.