अमृतसर : पंजाबच्या अमृतसर शहरात एक मोठा हल्ला करण्यात आलाय. अमृतसरच्या निरंकारी भवनात हा ग्रेनेड हल्ला झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीररित्या जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी निरंकारी भवनावर बॉम्ब फेकला आणि तिथून ते फरार झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना घडली त्यावेळी राजासांसी गावातील निरंकारी भवनात अनेक श्रद्धाळू सत्संगासाठी उपस्थित होते. 


उल्लेखनीय म्हणजे, पंजाब पोलिसांकडून तीन दिवसांपूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.