Blast at Police's Intelligence Headquarter: मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर संशयित रॉकेट पडल्याची बातमी पसरल्यानंतर खळबळ उडाली. स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोहालीतील पंजाब इंटेलिजन्स कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. बातम्यांनुसार, एक रॉकेटसारखी गोष्ट जमिनीवर आदळली आहे. या स्फोटामुळे तिसऱ्या मजल्यावरच्या काचा फुटल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.