नवी दिल्ली : ब्लू व्हेल गेमवर निर्बध घालण्यप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ब्लू व्हेल गेम ही राष्ट्रीय समस्या असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी एक समिती नियुक्त करण्यात आली असून पुढील तीन आठवड्यात ही समिती आपला रिपोर्ट सादर करेल असे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले. तसेच दूरदर्शन आणि इतर चॅनेल्सनी आपल्या प्राई टाईम कार्यक्रमाच्या माध्यमातून या गेमच्या धोक्यांबाबत जागरुकता निर्माण करावी असेही कोर्टाने सांगितले. 


तामिळना़डूमधील एका ७३ वर्षीय व्यक्ती ब्लू व्हेल गेमवर निर्बंध घालण्याबाबतची मागणी करणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या गेममुळे अनेक मुलांचे मृत्यू झालेत. 


या याचिकेत इतर गोष्टींसह या गेमच्या धोक्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता करण्याचे आदेश दिले गेले पाहिजे असे म्हटले आहेत. भारतातातच नव्हे भारताबाहेरही ब्लू व्हेल गेममुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला.