Home Loan News : पगार कसा येतो आणि कसा संपतो काहीच कळत नाही... असं म्हणणाऱ्या एका मोठ्या वर्गाची सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे गृहकर्जाचा अर्थात होमलोनचा हफ्ता. भविष्यातील तरतुदीच्या हिशोबानं घेतलेल्या घरासाठी कर्ज फेडणाऱ्या आणि बँकांकडून Home Loan घेतलेल्या अनेकांनाच ही बाब पटली असेल. कर्जाचा हफ्ता म्हणून एक मोठी रक्कम दर महिन्याला वजा होत असते आणि त्यामुळं नाही म्हटलं तरीही दर महिन्याच्या हिशोबाचं गणित थोडंथोडकं का असेना पण बिघडत असतं. आता मात्र इथं दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. कारण, एसबीआय आणि एचडीएफसी या बड्या बँकांना मागे टाकत सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेनं गृहकर्ज स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ही बँक म्हणजे Bank Of India. या बँकेच्या वतीनं नुकताच गृहकर्जाच्या व्याजरात कपात करण्याचा निर्णय घेत अनेकांनाच मोठा दिलासा दिला. सध्याच्या घडीला बँकेनं गृहकर्जावरील व्याजदरात 8.45 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर आणले आहेत. शिवाय बँकेकडून आकारली जाणारी प्रोसेसिंग फीसुद्धा पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गृहकर्जावरील कपातीची ही सवलत 31 मार्च 2024 पर्यंत लागू असणार आहे. 


हेसुद्धा वाचा : ... तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल


सर्वात स्वस्त होमलोन इथंच 


सध्याच्या घडीला बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणारं गृहकर्ज हे देशातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याची बाब स्पष्ट होत आहे. या क्षेत्रात एसबीआय आणि एचडीएफसी अशा अग्रगणी बँकाही बीओआयच्या मागेच आहेत. 


दरम्यान, फक्त  गृहकर्जच नव्हे तर घरांवर सौरउर्जा प्रकल्पांअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठीसुद्धा बँक ऑफ इंडियाकडून कोणत्याही प्रोसेसिंग फीशिवाय 7 टक्के व्याजदरानं कर्ज किलं जात आहे. इतक्यावरच न थांबता बँकेकडून लोन पॅकेज ओवरड्राफ्ट सुविधेसोबत वाढवण्यात आलं आहे. ज्यामुळं आता घर खरेदी प्रक्रियेमध्ये किमान कर्जाच्या बाबतीत तरी बँकेकडून कोणताही अडथळा येणार नाही.