कोलकाता : कोलकाताच्या डमडम रेल्वे स्टेशनवर सोमवारी एक धमाका झाला. ज्यामध्ये एका व्यक्तीचा हालत गंभीर आहे. घटनेनंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आजुबाजुला आणखी तपास शोध घेतला असता आणखी 10 देशी बॉम्ब सापडले आहेत. राज्य पोलिस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. कचरा वेचत असतांना हा धमाका झाला. ज्यामध्ये तो व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.