मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आजपासून नवरात्र सुरू होत असून पाठोपाठ दसरा आणि दिवाळी देखील येत आहे. पितृपक्षात सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला पण यापुढे सण सुरू झाल्यावर सोन्याच्या दरात वाढ होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिता तर आता योग्य वेळ आहे. ग्राहकांनी तर सोन्यात गुंतवणूक करायला सुरूवात देखील केलं आहे. काहींनी सोनं बुक केलं असून त्याची ते सोनं धनत्रयोदशीच्या दिवशी घेणार आहे. 


आताची सोन्या-चादींची किंमत 


अमेरिकेच्या डॉलरमध्ये वाढलेल्या दरामुळे सोने आणि चांदी फिकी पडली आहे. पूर्ण आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 1 आठवड्यात 1,500 डॉलर एका टक्क्याने खाली आले आहे. 


1500 डॉलरहून कमी दर


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 17.05 डॉलरने 1.13 टक्क्याहून खाली आले असून आता 1,493 प्रति एक टक्का असे आहे. तसेच अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापाराच्या दृष्टीने पुढच्या महिन्यात चर्चा होणार आहे. ज्यामुळे बाजारात चढाव पाहायला मिळत आहे. आणि याचा फायदा सोने आणि चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. नवरात्री पाठोपाठ येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या सणांमुळे सोन्याच्या दरात मोठा बदल होणं अपेक्षित आहे. 


सोन्याचा आताचा दर 


सोने स्टँडर्ड प्रति 10 ग्रॅम - 38,970 रुपये 
सोने प्रति 10 ग्रॅम - 38,800 रुपये 
चांदी प्रति किलो - 46,250 रुपये 
सिक्के 950 रुपये