नवी दिल्ली : भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून होत असलेल्या या गोळीबारामुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं आहे. या गोळीबारामुळे अरनिया सेक्टरमधील जवळपास ४०,००० ग्रामस्थांनी आपली घरं सोडली असून स्थलांतर केलं आहे. 


ग्रामस्थांनी स्थलांतर केल्यामुळे अरनिया सेक्टर ओसाड पडलं आहे. आजुबाजुच्या परिसरात आता काही नागरिकचं राहीले आहेत.


जमिनीवर सांडलेलं रक्त, तुटलेल्या खिडक्या-दरवाजे, जखमी जनावरं आणि घराच्या भिंतींवर छऱ्यांची निशाण असं चित्र पहायला मिळत आहे. 


आर एस पुराचे उप-विभागीय पोलीस अधिकारी सुरिंदर चौधरी यांनी सांगितलं की, सुरक्षिततेचा उपाय म्हणून अरनिया क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र हलवण्यात आले आहे.


जम्मूचे उपायुक्त कुमार राजीव रंजन यांनी सांगितलं की, जम्मू जिल्ह्यातील अरनिया आणि सुचेतगढ सेक्टरमधील ५८ गावं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झाले आहेत.


सीमाभागात राहणाऱ्या ३६,०००हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. आतापर्यंत १३१ जनावरं मारले गेले आहेत तर, ९३ जखमी झाले आहेत. तसेच सीमाभागातील ७४ इमारती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सांबा जिल्ह्यातील सांबा आणि रामगढ सेक्टरमधील ५०००हून अधिक तर, कटुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील ३०००हून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.