मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक गल्लीबोळापासून सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नव्या आशा, नवी सुरुवात आणि नव्या संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा सण म्हणजे परवणीच. अशा या सणाचा उत्साह देशाच्या सीमेवरही पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेवर सैनिक तैनात आहेत म्हणून देश दिपोत्सव उत्साहात साजरा करू शकतो. मात्र सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनीही दिवाळीनिमित्त वेळात वेळ काढून आनंदोत्सव साजरा केला. 


जम्मूच्या आर. एस. पुरा सेक्टरमध्ये तैनात बीएसएफ जवानांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. आंतरराष्ट्रीय सीमेवर दिवे लावून सैनिकांनी दिपोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं. 


प्रत्येक युनिटमध्ये असलेल्या छोट्याशा मंदिरात मंदिर परेड करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. एरवी खराखुरा दारूगोळा हाताळणाऱ्या आणि शत्रूवर दारूगोळ्याचा मारा करणाऱ्या जवानांनी  शोभेचे फटाकेही फोडले. दिवाळी निमित्त मिठाई वाटून जवानांनी आनंद व्यक्त केला.